हे चौघे मित्र निसान कंपनीच्या टोरानो गाडी एमएच ४५ एन ००८  या मोटारीतून रात्री अकलूजमध्ये महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे येत होते परंतु भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला दोन झाडांना आणि मैलाच्या दगडाला धडकली आणि उलट फिरली.सदरील अपघात इतका भीषण होता की मोटारीत पाठीमागे आसनावर मध्यभागी बसलेला राहुल कोळेकर यांच्या डोक्याची कवटी फुटून बाहेर रस्त्यावर उडून पडली होती.दरम्यान अन्य दोघांना जखमी अवस्थेत तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेदरकारपणे मोटार चालविताना नियंत्रण सुटल्यामुळे काही क्षणातच हा अपघात झाला असल्याचा कयास वर्तविला जात असून अकलूज पोलीस या अपघातप्रकरणी तपास करीत आहेत.