माजी खासदार राणा म्हणाल्या,नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचे प्रमाण बघा.भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मते मिळाली आहेत त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचे ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असे बोलत होते त्यांनी आता पाहिले असेल की खरा वाघ कोण आहे.तसेच मला वाटते की मी आता पराभूत झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणे टाळले होते. दरम्यान या पराभवानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.राणा म्हणाल्या,पाच वर्षांपूर्वी जनतेने मला अमरावतीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवले होते परंतु यंदा मला त्यांनी का थांबवले हे मला अजूनही समजू शकलेले नाही मात्र हा पराभव म्हणजे शेवट नाही गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केले आहे असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.दरम्यान यावेळी राणा यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला असून नवनीत राणा म्हणाल्या, काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात तर काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात असे त्यांनी नमूद केले आहे.