हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजनेत तालुक्यातील सर्व मंडळाचा समावेश करावा- महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जून २४ शनिवार
हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजनेत यावल तालुक्यातील एकाही महसूल मंडळातील अति तापमानात ४५अंश सेल्सिअस नोंद नसल्याने केळी उत्पादकांवर झालेला अन्याय त्वरित आठ दिवसात दूर करून अति तापमानामध्ये यावल तालुक्याचा समावेश करण्याची मागणी येथील महाविकास आघाडीच्या वतीने काल दि.१४ जून शुक्रवार रोजी येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तसेच अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
गेल्या मे महिन्यातील १६ ते २५ तारखेपर्यंत तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात तापमान ४६ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान राहील्या नंतरही एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या हवामान यंत्रणेकडून मात्र तालुक्यातील एकाही महसुली मंडळात ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद दर्शविली नसल्याने केळी उत्पादक नुकसान भरपाई पासून वंचित राहणार आहे.सदरहू एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून तालुक्यातील केळी उत्पादकांची ही थट्टा मस्करी केली जात असल्याची भावना तहसीलदार नाझीरकर व प्रभारी यावल तालुका कृषी अधिकारी सागर सिन्नारे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.येत्या आठ दिवसात हवामान यंत्रणेचा अहवाल मागवून तापमानाच्या अहवालाची सखोल चौकशी करून यावल तालुक्यातील संपूर्ण मंडळाचा अती तापमानात समावेश करावा अन्यथा महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट )तसेच शिवसेना( उद्धव ठाकरे गट )यांचे वतीने स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर प्रा.मुकेश येवले,अतुल पाटील,कदीरखान,विजय पाटील,अब्दुल सईद,हाजी अकबर खाटीक,एडवोकेट कोमलसिंग पाटील,गिरीश क्षीरसागर,ललित विठ्ठल पाटील,सहदेव पाटील,पांडुरंग पाटील,संतोष तायडे,निलेश बेलदार,गजानन पाटील,ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती पाटील,अनिल जंजाळे,जगदीश कवडीवाले,संतोष खर्चे,डॉ.विवेकअडकमोल,सारंग बेहेडे,राजेश श्रावगी,शहाजी भोसले,शरद कोळी,विकास बारेला,बाळकृष्ण पाटील,बळवंत निंबाळकर,प्रल्हाद बारी यांचे सह महाविकास आघाडीच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.