दरम्यान भाजपात काय चालले आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा महाविकास आघाडीत काय चालले याची चिंता केली पाहिजे.लोकसभेचा निकाल लागल्यापासून आपण पाहतो आहे की,काँग्रेस आणि शरद पवार गट दावे करत आहेत.दोघेही आपण मोठे भाऊ आहेत असे विधान केले होते. उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत अशी तक्रार यांनी केली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सन्मान कसा मिळेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे प्रत्युत्तर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.तर विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व आहे त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे केंद्र शासन ठरवेल.जेथे जातील तेथे ते यश मिळवण्यासाठी बारकावे शोधत असतात ते आणखी मोठे होतील त्याचा आम्हाला आनंद आहे.भाजपचे जे ठरते ती गोष्ट शेजारच्या मुंगीलाही कळत नाही असे सूचक विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.