मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जून २४ मंगळवार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून सध्या उपोषण स्थगित केले असले तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.१३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.आता त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला असून टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.एक दोन जिल्ह्यांत बोगस नोंदी झाल्या आहेत.उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी हा प्रश्न समोर आला असा आरोप केला जात असून त्यावर मनोज जरांगे म्हणाले,संविधानाच्या पदावर बसूनही छगन भुजबळांना कळत नाही.स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना वेड्यात काढले.मी हैदराबाद गॅझेट आणले आहे.१८८४ ची जनगणना आहे.रेकॉर्डेड ओरिजिनल प्रिंट आहे यात सर्व मराठा समाज कुणबी आहे.भूमि अभिलेख ३७ क्रमांकावर आहे हे बोगस आहे का ? तुम्हाला दिलेले आरक्षणच सुरक्षित नाही.मराठा आरक्षणासाठी ओबीसी आणि धनगर समाजाकडून विरोध केला जात असून या दोन्ही समाजाचे नेते मराठा आरक्षणाविरोधात एकत्र आले आहेत यावरून मनोज जरांगे पाटलांनी या नेत्यांनाच आवाहन केले आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही ते बधिर झाले आहेत त्यांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार आहेत.मोठे इंजेक्शन द्यावे लागणार आहे.सर्वांत जास्त ओबीसीचे वाटोळे त्यांनी केले आहे.आपण दोघांनी (मराठा आणि धनगर ) शहाणे व्हायला पाहिजे व या संधीचे सोनं केले पाहिजे.धनगर मराठा,मुस्लीम आणि दलित एकत्र आले तर सत्ताच हस्तगत होऊ शकते.तुम्ही नाही दिले तरीही आम्ही ओबीसी आरक्षणात जाणार आहोत.मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध झाले आहे.आमच्याकडे नोंदी आहेत त्यापेक्षा डोके लावा आणि सत्ताच हस्तगत करा.
एसटी आरक्षणाला एवढी ताकद लावली असती तर आतापर्यंत आरक्षण मिळाले असते तरीही आम्ही तुम्हाला विरोधक मानले नाही.मी एकाही नेत्याला दुखावले नाही.आपण कांदा फोडून खाणारे लोक आहेत त्यामुळे नेत्यांचे ऐकू नका.कदाचित एक दोन वर्षांनी धनगर बांधवांनी ठरवले की एसटीत आरक्षण घ्यायचे त्यांना मिळू शकते.१३ तारखेच्या आत आरक्षण नाही दिले तर इतके जड जाईल की त्याच दिवशी कळेल असा इशाराही त्यांनी दिला.चार आयोगांनी सांगितले आहे,सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असे छनग भुजबळ म्हणाले आहेत असे विचारल्यावर,मनोज जरांगे म्हणाले,त्यांना राष्ट्रपतीच केले पाहिजे.आयोगाचा आणि ओबीसी आरक्षणाचा काय संबंध ? आयोगाने ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नाकारले आहे परंतु आम्ही आधीच ५० टक्क्यांच्या आरक्षणात आहोत.ओबीसी आणि धनगरांना सांगणे आहे की यांच्या (छगन भुजबळांच्या) नादाला लागू नका.राजकीय उदय होण्याची क्षमता आहे.हे बाद झालेले केस आहेत.तुम्ही तुमचे करिअर यांच्या नादाला लागून खराब करून घेऊ नका.आम्ही ओबीसीत आलो तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही.मग मराठ्यांची नाराजी का पत्करत आहात ? एकसंघ राहा.तुमचे एसटीतील आरक्षण मिळेल.आतापर्यंत करोडो पोरांना आरक्षण मिळाले असते.आमचे भांडण तुमच्याशी नाही सरकारशी आहे.येवलावाल्यानाही पालथ केले तर नाव सांगणार नाही.कितीही आडवे या तरीही ओबीसीतच जाऊन दाखवणार असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.