मोमिरुल यांच्यासोबत निर्मल जोते येथील १५० हून अधिक रहिवाशांनी बचावकार्यात मदत केली.ईदचा उत्साह विसरून त्यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी प्राधान्य दाखवले.रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेकांनी आपल्याच वाहनातून प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेले तर काही प्रवाशांनी विश्रांतीसाठी स्थानिक रहिवाशांच्या घरी आसरा घेतला.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पोलीस,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तासाभराने अपघातस्थळी पोहोचले.निर्मल जोते येथील आणखी एक रहिवासी मोहम्मद नजरुल यांनी सांगितले की त्यांना अपघातस्थळी सहा मृतदेह सापडले आणि सुमारे ३५ जणांना वाचवले.मी उत्सवाची तयारी करत होतो.अपघाताची माहिती पसरताच मी घटनास्थळी गेलो यात एक वृद्ध महिला जखमी झाली होती तिला उभे राहता येत नव्हते.मी तिला पाण्यासाठी रडताना पाहिले.ती असहाय्य दिसत होती.मी तिला धीर दिला आणि नंतर तिचे नातेवाईक सिलीगुडीहून आले आणि तिला परत घेऊन गेले असे येथील रहिवासी तस्लिमा खातून म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या,मागील वर्षी बालासोर रेल्वे अपघात झाला तेव्हाच्या बातम्या पाहिल्याचे मला आठवते पण मी असे काही पाहीन असे कधीच वाटले नव्हते असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.