एकनाथ शिंदे वर्धापन दिन साजरा करत असतील तर तो हास्यास्पद प्रकार आहे.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा पाया घातला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा आम्ही आमच्या खांद्यावर घेतला.तो झेंडा शिंदेंच्या खांद्यावर नाही.आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जोमाने पुढे जात आहे.आता जे कुणी गट वगैरे आहेत ते म्हणत असतील की आमची शिवसेना खरी आहे त्यांनी जरा आरसा बघावा.पैशांनी मते विकत घेण्याला जनाधार म्हणत नाहीत.आपला पक्ष मोदी-शाह यांच्या पायाशी ठेवणे याला विचारधारा म्हणत नाहीत.लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून तो वाघ होत नाही.शिंदे-मिंधे उपटले कुठून ? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.हिंदूहृदय सम्राटांच्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना.बाकीच्या उपऱ्यांना भाजपाने म्हणजे मराठी माणसाच्या शत्रूने आणले आहे अशा पद्धतीने शिवसेना फोडणे हे महाराष्ट्रावरचे सर्वात मोठे आक्रमण आहे.मोगलांनी केलेल्या आक्रमणानंतर मोदी शाह यांचे हे आक्रमण सर्वात मोठे आहे.शिवसेना फोडल्याने मिंधे-शिंदे वगैरे जे गट आहेत त्यांनी काहीही समजले तरीही विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.