भाजपाच्या नेतृत्वाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावे.त्यांचा राजीनामा मान्य करू नये,विधानसभा निवडणूक होईपर्यंत ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे असे अनिल देशमुख म्हणाले.तसेच जे जितके दिवस उपमुख्यमंत्री म्हणून राहतील तेवढा महाविकास आघाडीला राज्यात फायदा होईल अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली असून  राजीनामा मान्य करू नये,विधानसभा निवडणूक होईपर्यंत ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.सरकारमधून मुक्त केले तर राज्यभर फिरून संघटना मजबूत करण्याचे काम करेन असे फडणवीस यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे स्पष्ट केले होते.ही भूमिका फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडेही मांडली होती मात्र अमित शाहांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदी कायम राहण्याचे निर्देश दिले होते.