या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असतांना ठोस दोषा आरोपपत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.खरेतर अशा घटना घडत असतांना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन व हत्येपर्यंत मजल जाणे त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे.राज्य महिला आयोगाच्यावतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.दरम्यान नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) याचे एका मुलीवर मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र प्रेयसी अन्य मुलांशी बोलत असल्याचा संशय रोहितला होता यावरून त्या दोघांमध्ये भांडण होत होती त्यामुळे रोहित संतप्त झाला होता.रोहितची प्रेयसी वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती.काल मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती मात्र गावराई पाडा येथील परिसरात रोहितने तिला अडवले.दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी रोहितने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले यामध्ये तिचा मृत्यू झाला.या घटनेनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला.वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले.