मशाल आणि भगवा यांच्यात साधर्म्य आहे व ती मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आग लावली आहे.भुपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मंत्री म्हणून नालायक ठरले आहेत त्यांना आता महाराष्ट्राचे प्रभारी नेमण्यात आले आहे.महाराष्ट्रात ते खालसा होणार आहेत.देशाच्या मंत्र्यांना पक्षाचे काम देणार असाल तर देशाचे काम करणार कोण ? असे घडले तर अपघात होणारच असेही उद्धव ठाकरे म्हणाले.’पुन्हा येईन,पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहेत जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा.आता वाजवले की बारा तुमचे.बारा वाजवले आहेत तरीही सत्यानास करायचा आहे.कुणाची महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाही असे हे सरकार चालले आहे.आता लढाई लढायची आहे आता आपल्याला थांबता येणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.जनतेच्या न्यायालयात आम्ही आमची लढाई जिंकलो आहोत मात्र आता आम्हाला हेच वाटते आहे की हे सरकार पडलेच पाहिजे.आपल्यावर आरोप करायचे शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाही म्हणजे काय ? हे सांगाल का देवेंद्र फडणवीस ? तुम्ही जे त्रांगडे करुन ठेवले आहे आणि मला नागपूरच्या अधिवेशनात म्हणाला होतात ‘काट्याच्या अळीवर वसली तीन गावे एकही वसेचि ना,आता ते काढून ऐका तुमचे तुम्ही’ असाही टोला देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.