आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला व तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखले.आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे आपण निवडणुकीमध्ये पाहिले. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी देतो.आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिले.मात्र याच मेळाव्यात रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे व तोदेखील अजित पवारांच्या महायुतीत येणाऱ्यावरुन.

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावे लागले त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चालले असते असे रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हटले असून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहे.मात्र अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे.आता यावर देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसेच दस्तुरखुद्द अजित पवार यावर काय बोलणार ? हे पाहणेही महत्त्वाचे असेल.