कला वाणिज्य महाविद्यालय व बालसंस्कार विद्या मंदिर तसेच डोंगर कठोरा येथील चौधरी विद्यालयात आंरतरराष्ट्रीय योग दिन साजरा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,यावल
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलीत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणावर योग शिक्षिका सुरेखा अशोक काटकर यांनी शिक्षकांना योगाचे महत्त्व या विषयासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.शारीरिक मानसिक आरोग्य भावनिक स्थैर्य श्वासोस्वास या विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले तसेच त्यांनी योग कार्यक्रमास उपस्थितांकडून वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली.या कार्यक्रमाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सी.के.पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी वरिष्ठ,कनिष्ठ व किमान कौशल्य विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,प्रा.मुकेश येवले,प्रा.मनोज पाटील,डॉ.हेमंत भंगाळे,मिलिंद बोरघडे यांनी परिश्रम घेतले.
अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा
येथील अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ डोंगर कठोरा संचलित अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज मध्ये आज दि.२१ जून शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने शाळेच्या पटांगणावर शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या वतीने सामूहिक योगासन करण्यात आले.तर मुख्याध्यापक नितीन झांबरे व वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांनी आजच्या घडीला योगा करण्याची गरज व फायदे तसेच दैनंदिन जीवनात निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी योगा करणेबाबतचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.प्रसंगी इयत्ता ५ वि ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला हे विशेष !.यावेळी मुख्याध्यापक नितीन झांबरे,वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार,आर.के.जानकर,पी.पी.कुयटे,आर.व्ही.चिमणकारे, मनीषा तडवी,सचिन भंगाळे,शुभांगीनी पाटील,विवेक कुलट,सोनाली फेगडे,चेतन चौधरी शिक्षकेतर कर्मचारी ठकसेन राणे,योगेश राणे,संदीप बाऊस्कर,मिलिंद भिरूड यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालसंस्कार विद्या मंदिर,यावल
येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी व्दारे संचलीत बालसंस्कार विद्या मंदिर शाळेत आज दि.२१ जून २४ रोजी शाळेच्या परिसरात अंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या एकूण ४८५ विद्यार्थी व १३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृतियुक्त मार्गदर्शन प्रशांत महाजन,पंढरीनाथ महाले व सविता वारके यांनी केले.सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांनी विद्यार्थ्यांना निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योग करणेबाबतचे महत्व सांगितले व आजपासून नियमित योगा करण्याचे आवाहन केले तसेच आपल्या आईवडील यांना पण योगा करण्याचा आग्रह करावा असे सांगितले.सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी आसन व्यवस्था सुनील श्रावगी व प्रकाश जयकारे यांनी तर फलकलेखन पुरुषोत्तम साठे व संजय चौधरी यांनी केले.