यावेळी बोलतांना शिवसेनेचे खा.माने म्हणाले,महामार्ग रद्द  व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल व संसदेतही  याबाबत प्रश्‍न उपस्थित करू.देवाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर देवही माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगितले.राज्यातील बारा जिल्ह्यातून ८०२  किलोमीटरचा प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातुन जात आहे व यासाठी २७ हजार ५०० हेक्टर जमिन संपादित केली जाणार असून या  मार्गामुळे सांगली जिल्ह्यातील १९ गावातील पाच हजार शेतकरी बाधित होणार आहेत.मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे व या महामार्गासाठी कर्नाळपासुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही.दुर्दैवाने महापुर आलाच तर सांगली शहर व परिसरातील गावांना फार मोठा फटका बसणार आहे यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची आग्रही मागणी होत आहे.