माझ्या माहितीनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक झाली व त्यातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध केलेला आहे त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भातील बातम्या या कल्पोकल्पित आहेत.अद्याप कोणत्याच पक्षाने जागा वाटप सुरु केलेले नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर काही आरोप केले होते.मतदान सुरू असतांना उद्धव ठाकरे यांनी संथगतीने मतदान सुरु असल्याचे म्हटले होते व भाजपाने त्यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने यांसदर्भातील अहवाल मागवला आहे. यासंदर्भात बोलतांना अंबादास दानवे म्हणाले,निवडणूक आयोगाने त्यावेळी हे केले असते तर बरे झाले असते.तेव्हाच तत्काळ लक्ष द्यायला हवे  होते मात्र काही हरकत नाही.देर आए,दुरुस्त आए.आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असे काही होऊ नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यावी असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.