तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदार कमी धान्य देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ जून २४ सोमवार
तालुक्यातील राशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाने ठरवुन दिलेल्या धान्य कोट्यातुन दोन ते तिन किलो धान्य कमी दिले जात असुन अशाप्रकारे तालुक्यातुन लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जात असल्याने या मागे मोठा रेशनिंग घोटाळा तर नाही ना ? असा प्रश्न देखील यावेळी मोर्चा प्रसंगी उपस्थितांनी केला आहे.
दरम्यान तालुक्यातील लाभार्थ्यांनी शिधापत्रिकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार केल्यावर देखील तहसीलदार यांच्याकडून आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) गटाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,युवक तालुका अध्यक्ष आकाश फेगडे,युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या धान्य वाटप संदर्भात तक्रार निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की,यावल तहसील कार्यालयाने आय.एस.ओ.कार्यालयाप्रमाणे दलालमुक्त शिधावाटप मोहीम राबवावी यासह पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे ११ विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी ताभार्थ्यांचे तक्रारींची सविस्तर माहिती घेत आपण या मागण्यांचा योग्यरित्या पाठपुरावा करू असे आश्वासन शिधापत्रिका धारक महीलां व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना दिले.प्रसंगी यावल तहसील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते व आदि अधिकारी उपस्थित होते.