चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असतांना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते.अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत अशी एक्स पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.अजित पवार गट आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील महायुतीचे सदस्य असूनही या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झाले आहे त्यामुळे महायुतीत बिघाड झाल्याची चर्चा आहे.पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थाचा विषय चांगलाच गाजत आहे.आज काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली.यावर प्रत्युत्तर देतांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की,अशा प्रकारच्या सर्व घटनांना थेट मंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नाही.जर मंत्र्यांची इनव्हॉलमेंट असल्याचे सिद्ध झाले तर अशा पद्धतीने बोलायला हरकत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.