Just another WordPress site

शरद पवार आणि आशीष शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी एकत्र !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा)

भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आहेत.पण राजकारणात कोणीही शत्रू नसतो असे म्हटले जाते.हीच गोष्ट आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.कारण आता शरद पवार आणि आशीष शेलार हे निवडणूकीसाठी एकत्र आले आहेत.राजकारणात गेम आणि खेळात राजकारण काही नवीन नाही.खेळातील राजकारण करण्यासाठी आता शरद पवार आणि आशीष शेलार हे दोघेही पुढे सरसावले आहेत.कारण आता या दोघांना खुणावते आहे ती मुंबई क्रिकेट असोसिसएशनची निवडणूक.येत्या काही दिवसांमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आता शरद पवार व आशीष शेलार एकत्र आले आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी मुंबईपासून ते आयसीसीपर्यंत सर्वच संघटनांची अध्यक्षपदे भूषवली आहेत.पण वयाच्या नियमामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही.शरद पवार हे राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याला अध्यक्षपपदासाठी उभे करू शकले असते पण त्यांना वगळता अन्य कोणत्याही नेत्याकडे दांगडा अनुभव नाही.आशीष शेलार हे बऱ्याच कालावधीपासून मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई क्रिकेट असोसिशनमध्ये नेमके काय करायचे हे सांगावे लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.