एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,महाराष्ट्र सरकारने यासंदर्भातील परिपत्रत जारी केले असून या परिपत्रकात कैसर खालिद यांना पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे तसेच जोपर्यंत हे निर्देश लागू आहेत तोपर्यंत त्यांना निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय असलेले इतर भत्ते अदा केले जातील असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.या परिपत्रकानुसार कैसर खालिद यांनी निकषांकडे दुर्लक्ष करत हे होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिली असा आरोप करण्यात आला आहे तसेच त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता स्वतःहून होर्डिंग मंजूर केले असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.