भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे.सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले.मोदी आणि गांधींनी अध्यक्षपदांना त्यांच्या खूर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खूर्ची स्वीकारली.बिर्ला यांचा गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले.दरम्यान काल दि.२५ जून रोजी संध्याकाळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमत होऊ न शकल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता.इंडिया आघाडीच्या वतीने के.सुरेश यांनी अर्ज केला होता.

सोमवारी रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी नेत्यांशी ओम बिर्ला यांच्या नामांकनावर सहमती मिळवण्यासाठी चर्चा केली परंतु उपाध्यक्षपद मिळाल्यास आम्ही अध्यक्षपदासाठी समर्थन देऊ अशी अट खरगे यांनी ठेवली परंतु यावर आपण नंतर चर्चा करू असे राजनाथ सिंह यांनी सांगितले मात्र त्यानंतर चर्चा झाली नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.