Just another WordPress site

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी !! दोन्ही गटांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

२७ जून २४ गुरुवार

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून काल बुधवार रोजी सकाळी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील फैजपुर रोडवरील बसस्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी एक जण असे दोन जण जखमी झाले आहेत.दरम्यान दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या असून एका गटातील अठरा आरोपींविरुद्ध तर दुसऱ्या गटातील ११ जणांविरुद्ध अशा २९ जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात फिर्यादी आकाश मधुकर बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मी आंतरजातीय प्रेमविवाह केला असून या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे.आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकाकडून रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या मात्र पत्नीचे नातेवाईक असल्याने व तिचे सांगण्यावरून मी पोलिसात फिर्याद दिली नव्हती.दि.२६ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मी यावल बस स्टॅन्डकडे माझ्या खाजगी कामानिमित्ताने जात असतांना बसस्टॅन्ड समोर प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे,निलू सुरेश बारसे व अन्य १६ जणांनी माझी मोटरसायकल अडवत माझेवर बंदुक रोखत अचानक मला पकडून गाडीवरून ओढून खाली पाडले व त्याचवेळी हातातील लोखंडी फायटरने छातीवर पाठीवर जोरजोराने मारहाण करून सुरुवात केली तसेच इतरांनी लाथा बुक्क्यांनी तुडविले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादित नोंद असून १८ संशयित आरोपीविरूध्द भादवि कलम ३०७ सह,आर्म अॅक्ट ३,२५ सह दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तर परस्पर विरोधी गटाकडून चंद्रकांत ऊर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मी यावल नगरपालिकेत सफाई कर्मचारी असून माझे सोबत प्रविण सुरेश बारसे हा सफाई कर्मचारी होता व आम्ही दोघे बस स्टॅंड चौकात साफसफाई करत असतांना आकाश मधुकर बिऱ्हाडे हा त्याचे मोटर सायकलने आमचे जवळ येवून ए साले,ए साले आम्हाला चिडवू लागला आम्ही त्याला सांगितले की,लोकांसमोर तु आम्हाला असे हिनवू नकोस आमची इज्जत कमी होते तेव्हा आकाश त्यांच्या साथीदारांनी आम्हाला पुन्हा शिवीगाळ करत आम्हाला शिवीगाळ करत फायटरसह लाथा-बुक्यांनी मारहाण केली.दरम्यान आकाश मधुकर बिऱ्हाडे यांचेसह ११ संशयित आरोपींचा समावेश आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली यावल पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.