यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
तालुक्यातील नायगाव येथील एका विवाहितेची सोन्याचे मंगळसुत्र असलेली पोत हरवली होती.दरम्यान ५० हजार रूपये किमतीची मंगळसुत्र असलेली सदरील सोन्याची पोत गावातील एका भाजीपाला विक्रत्या तरूणास सापडली व ती पोत त्या तरूणाने शोध त्या महीलेस परत केल्याने त्या तरूणाने दाखवलेल्या माणुसकी व प्रमाणीकपणाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील नायगाव येथील महिला चारूशिला हिम्मत पाटील या गावात किराणा व भाजीपाला खरेदीसाठी गेल्या असता सदर महिलेची मंगळसुत्र सोन्याची पोत हरवली होती.यात संपुर्ण कुटुंबाने या सोन्याचे पदक असलेल्या मंगळसुत्राचा सर्वत्र शोध घेतला पण मिळून आली नाही. दरम्यान गावातील सुनिल दौलत पाटील हा भाजीपाला विक्री करणारा अल्पभूधारक शेतकरी या तरूणास हि पोत रस्त्यावर मिळुन आली तेव्हा ही पोत काेणाची असावी असा तपास तरूणाने घेतला व गावातील पाटीलवाड्यातील महिलेची पोत हरवल्याचे त्यास कळाले व त्याने संबधीत विवाहितेच्या घरी जावुन प्रामाणिकपणे पोत परत केली.परिणामी सुनील पाटील हा भाजीपाला विकुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरूणाच्या प्रामाणीकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान सदरच्या तरूणास कदाचित ही पोत नकली असावी म्हणुन कोणी तरी फेकून दिली असावी असा अंदाज त्यांनी लावला.मात्र त्यातील सोन्याचे पदक हे खरे असल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी स्वत:हा गावात तपास करायला सुरवात केली आणी पाटील वाड्यात ते पोहचले तेव्हा तेथे चारुशीला पाटील व त्यांचे कुटुंबीय पोत शोधत असल्याचे पाहुन त्यांची स्वत:हुन प्रामाणीकपणे सदरील पोत आपणास सापडली आहे असे सांगत महिलेला पोत परत केली.यावेळी पोलीस पाटील मनोज देशमुख, नारायण चौधरी,सुनील पाटील,धोंडू कुंभार,आदित्य पाटील,विशाल पाटील,सागर बोदवडे,विकास सावळे,सामाजीक कार्यकर्ते सचिन तडवी, चंद्रशेखर पाटील,राहुल पाटील,दिवाकर धनगर,असिफ तडवी आदींच्या समक्ष पोत महिलेस देण्यात आली.