घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की,एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच हे जाहीर केले होते पण शेतकरी आत्महत्या करत आहेत.घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे ठीक आहे कारण त्यांची शेती पंचतारांकित आहे.हेलिकॉप्टरने जाणारे ते एकमेव शेतकरी आहेत.अमावस्या,पौर्णिमेला वेगळ पिक मुख्यमंत्री काढतात असेही कळले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला होता.डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे.लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा.या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका.कर्ता पुरुष असतो तसं अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते. चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले तसेच मोफत शिक्षणाचेही चॉकलेट दिले होते ती योजना पोकळ ठरली आहे.आता लोकांची सहनशक्ती संपली आहे.गाजर दाखवून तुमचे काम होणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.