चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ जुलै २४ रविवार
रावेर लोकसभेच्या खासदार तथा युवक राज्य क्रीडामंत्री नामदार रक्षाताई खडसे यांचा काल दि.६ जुलै शनिवार रोजी चोपडा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे सहर्ष नागरी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुक्यातील अन्वरर्दे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश बोरसे व विद्यमान लोकनियुक्त सरपंच सचिन शिरसाट,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर,सचिन धनगर तसेच महायुती पदाधिकारी यांच्या हस्ते रक्षाताई खडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचे चोपडा तालुक्यात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल दि.६ जुलै शनिवार रोजी चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथमच आगमन झाले.दरम्यान ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत भव्य रॅली काढून रक्षाताई खडसे यांचे चोपडा शहरात स्वागत करण्यात आले.प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा वासीयांशी संवाद साधत चोपडा तालुक्यातील समस्या सोडविण्यास कटिबद्ध असून विविध विकास कामांवर भर दिला जाईल असे नमूद केले.यावेळी तालुक्यातील अन्वरर्दे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश बोरसे व विद्यमान लोकनियुक्त सरपंच सचिन शिरसाट,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर,सचिन धनगर यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.