यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ जुलै २४ सोमवार
तालुक्यातील फैजपुर येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अनवर खाटीक यांच्या वतीने शहरासाठी मोफत जलसेवा करण्याकरिता देण्यात येणाऱ्या टँकरचे लोकार्पण राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व जिल्हा प्रभारी प्रसन्नजित पाटील,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते श्रीराम पाटील,प्रदेश चिटणीस एजाज मलिक यांच्या हस्ते लोकापर्णाचे कार्यक्रम फैजपुर शहरातील सुभाष चौक परिसरात पार पडले.दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वर खाटीक यांच्याव्दारे करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौत्तुक करण्यात आले.यावेळी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यामध्ये डॉ.प्रवीण बोरसे,माजी नगरसेवक शेख जफर,उपनगराध्यक्ष रशिद तडवी,अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख,युवा नेता वसिम जनाब,सामाजिक न्याय विभाग फैजपुर शहराध्यक्ष अशोक भालेराव,राजा ऊर्फ रमजान मोहसिन तडवी,आदीवासी शहराध्यक्ष कांग्रेस शहर उपाध्यक्ष आसिफ मेकेनिकल,राजोरा सरपंच विकास पाटील,दानिश मेंबर,अफजल खाटीक,जाकीर तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.