जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २४ सोमवार
नाशिक येथे होणाऱ्या नियोजित उपवर वर-वधू परिचय मेळावानिमित्त दि. १४ जुलै रोजी होणारी बैठक सभागृह उपलब्ध न झाल्याने सदरचा मेळावा स्थगित करून सदर मेळाव्या संदर्भातील बैठक दि.२१ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी १० वाजता नाशिक येथील लेखानगरसमोर राजीव रोड,हॉटेल ग्रॅड रिओशेजारी वेदांत मंगल कार्यालय व लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे.सदर बैठकीत आदिवासी कोळी समाजातील उपवर वरवधु पालक मेळाव्याचे नियोजन व आयोजन करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व उपवर वधू व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नारायण कोळी यांनी केले आहे.
दरम्यान जळगाव,धुळे,नंदुरबार,नाशिक,मुंबई,पुणे व संभाजीनगर या परीसरातील कामधंदा,नोकरी,व्यवसाय निमित्ताने आपल्या ग्रामीण भागातून वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेल्या समाज बांधवांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असून मुलामुलींचे रखडलेली उपवर, उपवधु,विधवा,घटस्फोटित,परीक्तता मुलामुलींना एकाच व्यासपीठावर आणून लग्न जोडणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य आयोजक नारायण कोळी साकरी यांच्यासह सल्लागार युवराज सैंदाणे,संजय शिंदे,अरूण सोनवणे,नाशिक पीएसआय भगवान सोनवणे यांनी सांगितले आहे.तरी सदर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक नारायण कोळी,कमलेश पुंडलिक रायसिंग,निलेश आधार सोनवणे,प्रकाश राजधर कोळी,ज्ञानेश्वर माधवराव सोनवणे,उल्हास काशीनाथ सोनवणे,नितीन विजय कोळी,जिवन जर्नाधन सोनवणे,विकास रामदास सपकाळे, कु.शितल प्रताप कोळी,कल्पना जर्नाधन सोनवणे,राहुल कोळी यांनी केले आहे.