Just another WordPress site

यावल येथील जश्ने ए पैरहन कमेटी अध्यक्षपदी शेख फारूख मुन्शी,उपाध्यक्षपदी शकील खान तर सचिवपदी हाजी फारूख शेख यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० जुलै २४ शनिवार

येथील शंभर वर्षाची परंपरा असलेले व हिन्दू मुस्लीम बांधवांच्या श्रध्देचे प्रतिक असलेल्या जश्ने ए पैरहन शरीफ डोलीची मिरवणुक यावर्षी काल दि.२१ जुलै रविवार रोजी डांगपुरा मोहल्ला कमेटीच्या वतीने काढण्यात येणार असून यासाठी पैरहन कमेटीच्या कार्यकारणीची निवड नौकरीच करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी शेख फारूक शेख मुन्शी यांची तर कुश्त्यांच्या दंगल कमेटी अध्यक्षपदी कच्छी तर सचिव हाजी फारूख शेख युसुफ व खजिनदारपदी रशीद हाजी शेख बशीर यांची निवड करण्यात आली आहे.

शहरातील शंभर वर्षाची परंपरा असलेल्या जश्ने ए पैरहन शरीफ निमित्ताने पैगंबराचे शिष्यांचे वस्त्र असलेल्या डोलीची मिरवणुक सालाबाद प्रमाणे फिरत्या पद्धतीने काढण्यात येत असते.यंदाची ही मिरवणुक काढण्याचा मान डांगपुरा मोहल्ला कमेटीला मिळाला असुन या जुलुस मिरवणुकीचे नियोजन करण्याकामी कार्यकारणीची पैरहन शरीफ कमेटीची निवड शेख करीम शेख रज्जाक मन्यार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.दरम्यान अध्यक्षपदी शेख फारुख शेख मुन्शी यांची तर उपाध्यक्षपदी शकील खान निसार खान,सचिवपदी हाजी फारूख शेख युसुफ,खजिनदार जब्बार हाजी शेख बशीर,कमेटीचे उप खजिनदार शेख रहीम ठेकेदार यांच्यासह कमेटी सदस्य म्हणुन शेख रफिक शेख हनीफ,शेख समिर शेख बशीर,शेख निसार शेख हमीद,रईस बिस्मिल्ला खान,शेख रशीद मन्यार,मुश्ताक शेख हुसैन,रशीद निसार कुरेशी, सलीम करीम कच्छी,जाकीर सलीम खान व सैय्यद मुजफ्फर सैय्यद इमाम यांची निवड करण्यात आली आहे.तर दि.२२ जुलै रोजी पैरहन निमित्ताने होणाऱ्या कुश्त्यांचे दंगल कमेटीच्या अध्यक्षपदी उमर अली मोहम्मद कच्छी यांची निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.