चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश – प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची माहिती
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० जुलै २४शनिवार
माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चोपडा विधानसभा मतदारसंघातील साकळी,दहिगाव,सावखेडा या ठिकाणी शिवदूत व बूथ प्रमुखांची बैठक नुकतीच संपन्न झाली.सदर बैठकीत चोपडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघातील आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघासाठी विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे.दरम्यान मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे.
दरम्यान यावल शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजनेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाली असून या योजनेसाठी ५९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ १९ गावांना शेती व शेती शिवार या योजनेचा लाभ होणार असून त्यात अनुक्रमे साखळी,दगडी मनवेल,विरावली,कोरपावली,महलखेडी,दहिगाव,चुंचाळे, बोराळे,गिरडगाव,वडोदा,शिरसाड,वाघोदा,नावरे या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.यावल उपसा सिंचन योजना मंजूर व्हावी यासाठी चोपडा विधानसभेच्या लोकप्रिय आ.लताताई चंद्रकांत सोनवणे २०२२ पासून पाठपुरावा प्रयत्न करीत आहेत व त्यांच्या या प्रयत्नामुळे या योजनेला यश आले व ही योजना मंजूर झाली.साखळी येथे शिवदूत व बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते साखळी येथील तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.साखळी येथे झालेल्या शिवसेनेच्या शिवदूत व बूथ बैठकीच्या वेळी मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे,सूर्यभान पाटील,भरत चौधरी,सुभाष नाना महाजन,विनायक पाटील,दिनू माळी,अशोक महाजन, विनोद खेवलकर,समाधान सोनवणे,दीपक सोनवणे,प्रताप कोळी,रामकृष्ण खेवलकर,महेंद्र चौधरी,प्रमोद सोनवणे,प्रकाश सोनवणे,दीपक खेवलकर,शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,शिवसेनेवर प्रेम करणारे उपस्थित होते.