पोलीस नायक
यावल-(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी ३ वाजता येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इमारती व परिसराचा उपयोग शिक्षणपयोगी संकल्पनांसाठी उपयोग करून पाठ्यपुस्तकातील अनाकलनीय गोष्टी अनुभवातून त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग समजून घेऊन शिक्षण आनंददायी करण्यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो ? यावर मार्गदर्शन करणेसाठी तसेच लोकसहभागातून बालापेन्टिंग उपक्रम राबविणे बाबत चर्चा करण्यात येणार आहे.या सभेला गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी,गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख,केंद्र प्रमुख महंम्मद तडवी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.तरी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी,पालकवर्ग,युवकवर्ग व ग्रामस्थांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू आढाळे व मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले आहे.