पोलीस नायक मुंबई (वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ३ चिन्हांचा पर्याय दिला आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणुक आयोगाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रभोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा ३ नावांचा पर्याय देण्यात आला होता तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या कडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे,बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे ३ पर्याय देण्यात आले होते.अखेर निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.
तर दुसरीकडे चिन्हांबाबत बोलायचे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल,उगवता सूर्य आणि त्रिशूल या ३ चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते.त्यातील मशाल हे चिन्ह त्यांना मिळाले आहे तर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उगवता सूर्य,त्रिशूल आणि गदा या चिन्हांपैकी गदा आणि त्रिशूल हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारली आहेत.धार्मिक चिन्ह असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने ही २ चिन्हे फेटाळली आहेत.नवीन पर्यायी चिन्ह देण्यासाठी आयोगाने शिंदे गटाला उद्या सकाळ पर्यंत मुदत दिली आहे.