चोपडा येथील घाणीचे साम्राज्याविरोधात महिलांचा एल्गार !! मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून समस्या सोडविण्यात महिलांना यश !!
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जुलै २४ शुक्रवार
शहरातील वार्ड क्रमांक सात मधील बडगुजर गल्लीला लागूनच सार्वजनिक शौचालय असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य वाढलेले असून त्याठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतांना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या वतीने नुकताच महिलांचा एल्गार मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घाणीचे साम्राज्य हटविण्याबाबत निवेदन देण्यात आले.प्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी याची तात्काळ दखल घेत जेसीबी पाठवून त्याठिकाणची साफसफाईची कार्यवाही केल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षा स्वाती बडगुजर यांच्यासह संगीता बडगुजर,गायत्री परदेशी,प्रमिला बडगुजर,बेबी बडगुजर, रत्ना भोई,अनिता भोई,दीपक भोई,राजेंद्र भोई,अरुण भोई आदींनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिल्यामुळे सदरील
निवेदनाची त्वरित दखल घेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी जेसीबी पाठवून साफसफाई करून कार्यवाही केली.परिणामी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक केले जात आहे.