मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये जागावाटपाबाबतही खलबत सुरु आहेत.काही दिवसांपूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणूक पार पडली होती व या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला होता कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप केला जात आहे.आता यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना इशारा दिला असून “कोणत्याही बदमाशाला पक्षात स्थान नाही.चुकीला माफी नाही” असे विधान प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.