रक्षाबंधन आख्यायिका :- १.पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

२.बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले.इंद्राची व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली.गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले,‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

३.भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते.राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली.

४.राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते.

५. तांदूळ,सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते.ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधते.हे राखी तू चलित होऊ नकोस.

६.श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्‍या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला.बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते.राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे.

७.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणा‍र्‍या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहते.

८.रक्षाबंधनाचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी असतो.अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब तीन पटीने वाढतात.

९.असात्त्विक भेटवस्तू रज-तमप्रधान असते.भावाने बहिणीला सात्त्विक भेटवस्तू द्यावी.सात्त्विक भेटवस्तू अर्थात कोणताही धार्मिक ग्रंथ,जपमाळ अशा वस्तू ज्यामुळे बहिणीला साधना करण्यात मदत होईल.

१०.बहिणीने भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’ अशी ईश्वराला प्रार्थना करावी असे विद्याविशारद पंडित ह.भ.प.दत्तात्रय गुरव यांनी सांगितले आहे.