यावल येथे नव भारत श्रीगणेश मंडळ कार्यकारणी जाहीर !! अध्यक्षपदी रितेष बारी तर उपाध्यक्षपदी उज्वल करांडे
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २४ गुरुवार
येणाऱ्या श्रीगणेश उत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदा देखील शहरातील नवभारत गणेश मित्र मंडळाची वार्षिक बैठक प्रमोद नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल नगरपरिषद माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते व भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे व भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,धीरज महाजन,नितीन महाजन राजू करांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाच्या श्रीगणेश उत्सवासाठी मंडळाची नुतन कार्यकरणीची निवड नुकतीच करण्यात आली.
सदर मंडळाच्या अध्यक्षपदी रितेश बारी तर उपाध्यक्षपदी उज्वल कानडे,खजिनदार स्नेहल फिरके सहखजिनदार ओम महाजन व सचिवपदी भोजराज ढाके यांची निवड करण्यात आली.प्रसंगी बैठकीचे सुत्रसंचालन पी.टी.चोपडे यांनी केले.दरम्यान बैठकीच्या सुरूवातीस कै.रमेश विठू पाटील कुटुंब नायक पडळसा तसेच यावल शहर व तालुक्यातील ज्ञात अज्ञात अशा व्यक्ती यांच्या निधनाबद्दल त्यांना दोन मिनिटे स्थभ उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व समाज बांधव व गणेशभक्त या तरूणांना तोला मोलाचे मार्गदर्शन केले.