protest against Badlapur School Sexual Abuse Case
                                            बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन

एसआयटीने म्हटले आहे की शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती मिळूनही पोलीस तक्रार केली नाही.पीडित मुलीच्या पालकांनी शाळेशी संपर्क केला होता तरीही शाळेने योग्य पावले उचलली नाहीत.एसआयडीने पॉक्सो कायद्याच्या २१ व्या सूचीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये लहान मुलाविरोधातला गुन्हा ठाऊक झाल्यानंतर त्यासंदर्भात कुणीही तक्रार करु शकते व ती न केल्यास या सूची अंतर्गत गुन्हा दाखल होतो.या प्रकरणात शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी कारवाईची मागणी केली होती तसेच स्थानिक नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही मागणी केली होती.ज्यानंतर आता एसआयटीने हे पाऊल उचलले आहे.टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.शाळा प्रशासनाने आम्ही दाखवलेला अहवाल फेटाळला त्यानंतर आम्ही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो तिथे आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले.बदलापूर प्रकरणात मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला.पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे.