Just another WordPress site

बदलापुर घटनेच्या निषेधार्त महाविकास आघाडीच्यावतीने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार

राज्यातील बदलापुर येथे माणुकीला काळीमा फासणारी व समाजमनाला सुन्न करणारी अशी संतापजनक घटना घडली असुन यात ३ वर्षाची व २ वर्षाच्या चिमूकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास कडक शासन होवुन त्यास फाशीची शिक्षा व्हावी व अकार्यक्षम गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन यावल येथे महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना नुकतेच देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ता अतुल पाटील, चोपडा येथील डी.पी.साळुंखे,ज्योती पावरा,अनिल साठे,युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,सईदभाई,शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनवणे,शिवसेना उबाठाचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले,राष्ट्रवादीचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक,शरद कोळी,संतोष खर्चे,आर.के. चौधरी,डॉ.विवेक अडकमोल,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष करीम मनियार,काँग्रेसचे अमोल भिरुड,विजय पंडित,अनिल पाटील,हितेश गजरे,नरेंद्र पाटील,ललित पाटील,प्रसन्न पाटील,किरण पाटील,सलीम तडवी,समाधान पाटील,बापू जासूद,शशिकांत पाटील,अरुण लोखंडे, कामराज घारू,मोहसीन खान,सद्दाम खान,निलेश बेलदार,पितांबर महाजन,मंगलाताई नेवे,ममता आमोदकर,भगवान बर्डे,सहदेव पाटील,गजू पाटील,एजाज मनियार,नईम शेख,विकी गजरे,किशोर माळी,नरेंद्र शिंदे,सचिन येवले,शेख अन्वर,शेख अशपाक भाई,ललित पाटील,पिंटू कुंभार,सुरेश कुंभार,राहुल गजरे यांच्यासह महाविकास आघाडी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.