यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
राज्यातील महायुतीच्या शासन काळात आठवडाभरात व महीना तसेच दिवसागणिक अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या असुन कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे.अल्पवयीन मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने अकार्यक्षम महायुती शासनाचा आंदोलन करीत जाहीर निषेध करण्यात आला असुन बदलापुर घटनेतील गुन्हेगारास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज रोजी मुक आंदोलन करण्यात आले.
राज्यात मागील आठवड्यात १३ ऑगस्ट रोजी बदलापुर येथे नराधमाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार,१५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी पुणे येथे शाळकरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार,२० ऑगस्ट रोजी एका नराधम शिक्षकाकडून सहा वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग,२० ऑगस्ट याच दिवशी ठाणे (मुंबई ) चांदीवली येथे एका गतीमंद मुलीवर अत्याचार,२० ऑगस्ट रोजी लातुर येथे साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक् अत्याचार,२१ ऑगस्ट रोजी नाशिक येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार,२१ ऑगस्ट रोजी खार (मुंबई) येथे दोन मुलींचे विनयभंग व मुंबई येथे अपंग मुलीवर अत्याचार,२१ऑगस्ट लाच पुणे येथे मैत्रीणींच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार,२१ ऑगस्ट रोजी नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत उपहागृहात काम करणार्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा केलेला लैंगिक अत्याचार,२२ ऑगस्ट रोजी नागपुर येथे आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार,२२ ऑगस्ट रोजी कोल्हापुर येथे दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची झालेली हत्या असा प्रकारे या संपूर्ण आठवड्यात घडलेल्या घटना असुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा वचक राहीलेला नसल्याने अशा प्रकारच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असल्याने शाळकरी अल्पवयीन मुली व महीला भागिनीच्या मनात असुरक्षेची भावना व भिती निर्माण झाली आहे.या सर्व घडलेल्या अत्याचाराच्या घटनांचा महाविकास आघाडीच्यावतीने यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर जाहीर निषेध करीत राज्याचे अकार्यक्षम गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच घडलेल्या अत्याचारातील पिडीत मुलींना न्याय मिळावा व यातील गुन्हेगारांना कडक शासन व्हावे अशा मागण्यांसाठी तोंडाला काळया पट्टया लावुन आज दि.२४ ऑगस्ट रोजी मुक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील,माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,युवक राष्ट्रवादीचे पवन पाटील,शिवसेना उबाठाचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष खर्चे,हसन तडवी,डॉ.विवेक अडकमोल,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कडू पाटील,तालुका उपप्रमुख शरद कोळी,पप्पु जोशी,कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष कदीर खान,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,माजी नगरसेवक समीर मोमीन,माजी नगरसेवक हाजी गुलाम रसुल,कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे,माजी नगरसेवक करीम कच्छी,भगतसिंग पाटील,अमोल भिरूड,हाजी गफ्फार शाह,अजहर खाटीक,एजाज देशमुख,अरूण लोखंडे,संतोष वाघ,नईम शेख,हाजी युसुफ शेठ यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या आंदोलनात आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.