सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार
शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तिच्या वर्गातील विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात पीडित मुलगी विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात शिकते.पंधरा दिवसांपूर्वी वर्गात गोंधळ सुरू असतांना पीडित मुलीने पाठीमागे वळून पाहिले असता एका मुलाने तिला उद्देशून अश्लील हावभाव केले होते.
मुलीने संयम पाळल्यानंतर पुन्हा त्या मुलाने दुसऱ्यांदा तिचा विनयभंग केला.मुलगी महाविद्यालयात दुपारी स्वच्छतागृहाकडे जात असतांना संबंधित मुलाने तिला अडवून अश्लील भाष्य केले नंतर पुन्हा त्याने असेच कृत्य केले तेव्हा मात्र मुलीने घरी हा प्रकार सांगितला त्यामुळे तिच्या भावाने महाविद्यालयात येऊन संबंधित मुलाला जाब विचारला तेव्हा हा प्रकार महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर आला.पीडित मुलीनेही जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली व त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ चित्रण मागितले असता या कनिष्ठ महाविद्यालयाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याचे उत्तर दिले. याबाबत शैक्षणिक संस्थांनी तातडीने ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.