मुख्यमंत्र्यांचा ताफा पळस्पे फाट्याला पोहचण्यापूर्वी जेएनपीटी ते पळस्पे मार्गावरील खड्डे बघून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री येणार असल्याने पनवेल महापालिका,नवी मुंबई महापालिका,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम रविवारी रात्रीपासून हाती घेतले होते तरीही खड्डे भरून न निघाल्याने सरकारी यंत्रणेची पोलखोल झाली.कामचुकार ठेकेदारांची केवळ हकालपट्टी करून किंवा त्यांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत.ठेकेदार पैसे घेऊन काम करतात,फुकट काम करत नाहीत त्यामुळे लोकांच्या जिवाशी खेळ केलेला चालणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.