ते पुढे म्हणाले,या प्रकरणात चूक शिल्पकाराची नाहीय.मला दु:ख आहे की आपले भारत सरकार आहे कारण ते अशा कामांसाठी निविदा  मागवतात त्यांच्यासाठी कलावंतांचा दर्जा महत्त्वाचा नाही.सर्वांत कमी रक्कम जे सांगतात त्यांना काम मिळते.उत्कृष्ट शिल्पकार महत्त्वाचा नाही. तो शिल्पकार त्याचे रेट देतो त्यामुळे महानगरपालिकेचे काम करण्यासाठी मी स्वतःला लायक समजत नाही हे दुर्दैव आहे कारण माझी रक्कमच पास होत नाही मग मी कशाला पाठवू ? तुमच्या कामाच्या दर्जाने तुम्हाला काम मिळत नाही जो कमी दराने काम करून द्यायला तयार असतो त्याला काम मिळते असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.