बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली.महिलांवर,मुलींवर अन्याय आणि अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा हा गंभीर गुन्हा आहे त्याला माफी नाही.दोषी कोणीही असो मग त्याला सोडले जाणार नाही.सरकारे येतील किंवा सरकारे जातील मात्र महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. मी तर सांगितले की अशा प्रवृत्तींना थेट फासावर लटकवा.आता भारतीय न्याय संहितेमधील तरतुदीमध्ये आता महिलांना घरूनही तक्रार करता येणार आहे तसेच नवीन कायद्यामध्ये अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत दोषींना फाशी आणि जन्मठेपेची तरतुद केलेली आहे.आरोपीला त्याच्या पुढच्या ५० पिढ्या आठवल्या पाहिजेत अशा नराधमांना माफी नाही.आता आपण यामध्ये ई-एफआयआर ही सुविधाही सुरु केली आहे. अनेकदा महिला गुन्हा दाखल करण्यासाठी कसे जायचे ? म्हणून घाबरतात पण आता ई-एफआयआर सुविधा राबवण्यात येणार आहे.शाळा असो किंवा रुग्णालये असो,कुठेही कोणतीही हयगय होणार नाही.जर यामध्ये कोणतीही हयगय झाली तर संबंधित अधिकाऱ्यांनाही जेलमध्ये चक्की पिसींग करायला लावणार त्यांनाही सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.