महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाची चर्चा झालेली नाही.आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीने ठरवल्यानुसार २८८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे त्यापैकी १०९ ठिकाणी आपले केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले.पक्षाने दिलेला हाच आपल्या जातीचा,धर्माचा,नात्याचा उमेदवार म्हणून त्याचे काम करावे.एखाद्या तालुक्यात १० तर दुसऱ्या ठिकाणी एक लाख मते देखील आपल्या पक्षाला पडतील.पक्षाचा एक आमदार असतांना कॅबिनेट व राज्यमंत्री असे दीड मंत्रिपद घेतले होते.आता १० आमदार निवडून आणा पक्षाचा मुख्यमंत्रीच करू असे देखील महादेव जानकर म्हणाले.मराठा समाजाचे १४ मुख्यमंत्री तरीही… मराठा समाजाचे राज्यात १४ मुख्यमंत्री झाले तरी देखील आरक्षण मागावे लागत आहे याचा विचार केला पाहिजे असे महादेव जानकर म्हणाले.मराठ्यांना आरक्षण मिळावे मात्र ओबीसीतून देऊ नये.महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील जानकर यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण होणे दुर्दैवी आहे असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.