अर्धी ट्रेन गेली पुढे व अर्धी ट्रेन राहिली मागे -रेल्वेचा मोठा अपघात टळला
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण ; कुठलीही जीवित हानी नाही
जळगाव – पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) हि मुंबईहून भुसावळ कडे येत असतांना चाळीसगाव स्टेशन नजीक असलेल्या वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डबे हे इंजिन सह पुढे निघुन गेले तर अर्धे इंजिन डबे हे मागेच राहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे.या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे माहिती मिळाली आहे.मात्र रेल्वे गाडी धावत असतांना सदरील प्रकार घडलेला असल्याने प्रवाशांमध्ये कमालीची भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) हि मुंबईहून भुसावळ कडे येत असतांना चाळीसगाव स्टेशन नजीक असलेल्या वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डबे हे इंजिन सह पुढे निघुन गेले तर अर्धे इंजिन डबे हे मागेच राहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे.डब्ब्यांचे कपलिंग सुटल्याने अर्धी ट्रेन मागे राहुन गेल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.मात्र वेळीच हि चुक संबंधितांच्या लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला .घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दल हे तातडीने दाखल झाले.रेल्वे डबे मागे सोडून गेलेल्या इंजिनला परत मागे आणण्यात आले व वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले.
सदरील प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल दीड ते दोन तास खोळंबली होती.रेल्वेच्या इंजिनला सर्व डबे जोडून झाल्यानंतर मात्र हि रेल्वे पुढील दिशेने मार्गस्थ करण्यात आली व रेल्वे वाहतूक काही तासानंतर सुरळीत करण्यात आली.या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन रेल्वेची पाहणी केली व घडलेल्या प्रकारची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.