यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
तालुक्यातील डांभुर्णी येथे राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवाशी धनुष भागवत कोळी वय ५८ वर्ष यांचे कुटुंब खाजगी कंपनी नौकरीच्या निमित्ताने भोपाळ मध्यप्रदेश येथे स्थायिक झाले असुन धनुष कोळी हे आजाराने त्रस्त झाल्यामुळे मागील चार ते पाच महीन्यापासुन आपल्या मुळ गावी डांभुर्णी येथे राहात होते.दरम्यान काल दि.१ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धनुष भागवत कोळी यांनी आपल्या वाल्मीक नगर मधील घरात गळफास घेत आत्महत्या केली.याबाबतची खबर मयताचा मुलगा विशाल धनुष कोळी वय-२६ वर्ष रा.डांभुर्णी,ह.मु.गोविंदपुरा इंडस्ट्रील ऐरीया सेक्टर ए पोचरग्लास चौराहा,शिव मंदिराजवळ भोपाळ मध्यप्रदेश यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.सदरहू पुढील तपास पोहेकॉ नरेन्द्र बागुले हे करीत आहे.सदरहू धनुष कोळी यांच्या मृत्युचे कारण स्पष्ठ होवु शकले नाही मात्र मागील काही दिवसापासुन ते आजाराने त्रस्त झाले होते त्यामुळे त्यांनी आजारास कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.