मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी होती यात काही शंकाच नसून महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला आहे.मुंबईत काल रविवार रोजी महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला पोलिसांनी संमती दिली नव्हती तरीही हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोले या महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.शरद पवार यांनी या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून पंतप्रधान मोदींच्या अंगाशी आले की माफी मागून सुटण्याचा प्रयत्न करतात असे शरद पवार यांनी म्हटले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी जे काही घडले ते दुर्दैवी आहे.”छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत त्यामुळे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो.” असे मोदी म्हणाले त्यापुढे ते म्हणाले,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोलले जाते त्यांचा अपमान केला जातो मात्र विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच मात्र ते न्यायालयामध्ये जातात त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही कारण हे त्यांचे संस्कार आहेत.महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगले ओळखते पण आमचे संस्कार वेगळे आहेत यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पण त्यातही राजकारण केले अशी टीका होते आहे.आता याच माफीवर शरद पवारांनी भाष्य केले आहे.
पुतळा कोसळला आणि सांगितले जाते पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली.त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितले की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते त्यांनी कधी माफी मागितली नाही.शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.विषय काय ? लोकांची अस्वस्था काय ? आता विषय काय आहे ? हे काय बोलत आहेत ? आता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते ? ज्यांनी रयतेचे राज्य आणले त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिले याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता.अंगाशी आले की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करतात असे शरद पवार यांनी म्हटले आहे.