महसूल कर्मचारी जिल्ह्याअंतर्गत बदली व पदभार निमित्ताने समारंभाचे आयोजन
डोंगर कठोरा येथे तलाठीपदी गजानन पाटील यांनी पदभार स्वीकारला
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ सप्टेंबर २४ शुक्रवार
जिल्ह्याअंतर्गत महसूल विभागात नुकत्याच काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यानिमित्ताने आज दि.६ सप्टेंबर शुक्रवार रोजी डोंगर कठोरा तालुका यावल याठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमात सदरील कर्मचारी व अधिकारी यांच्या बदली व पदभार निमित्ताने निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान भालोद मंडळातून मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांची नशिराबाद येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मंडळ अधिकारी म्हणून मिना तडवी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.तसेच डोंगर कठोरा येथील तलाठी वसीम तडवी यांची जामनेर शहर करिता बदली झाली असून त्याच्या जागी गजानन पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.तर तलाठी (सांगवी बु.ता.यावल) हेमांगी वाघ यांची जामनेर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी राजू गोरटे यांनी पदभार स्वीकारला आहे.दरम्यान बदली व पदभार स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे,मिना तडवी,तलाठी वसीम तडवी, गजानन पाटील,शरीफ तडवी,संदीप गोसावी,हेमांगी वाघ,राजू गोरटे,भारत वानखेडे,ग्रामस्थ डिगंबर खडसे,रवींद्र आढाळे यांच्यासह भालोद महसूल मंडळातील सर्व तलाठी, कोतवाल व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता कोतवाल विजय आढाळे व हरीश चौधरी यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत वानखेडे यांनी केले तर आभार संदीप गोसावी यांनी मानले.