यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार
येथील सामाजीक कार्यकर्ते मिथुन सावखेडकर यांची प्रहार अपंग क्रांती सेना या संस्थाच्या दिव्यांग विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
राज्याची मुलुख मैदान तोफ म्हणुन ओळखले जाणारे ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अपंग,अनाथ,विधवा, परितकत्या व निराधार यांच्यापर्यंत संस्थेचे ध्येय धोरण व कार्याची माहिती तसेच प्रसार प्रचार सर्व सामान्य पर्यंत पहोचुन त्यांना न्याय मिळून देण्याचे प्रयत्न करण्यासाठी अपंग क्रांती सेना ही संपुर्ण राज्यात कार्यरत आहे.दरम्यान प्रहार अपंग क्रांती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मिथुन अशोक सावखेडकर यांची संस्थेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांची नुकतीच निवड केली आहे.सदर निवडीचे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा सल्लागार शरद बारजिभे यांच्यासह प्रहार अपंग क्रांती संस्थाध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू व अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी,अपंग क्रांती संस्थेचे यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे,तालुका उपाध्यक्ष जनार्दन कोळी, उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील,दिलीप चौधरी,उत्तम कानडे,ललीत पाटील,प्रदीप माळी आदींनी त्यांच्या स्वागत केले आहे.