यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार
तालुक्यातील पाडळसे येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खा अहमद खा पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत येथील सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खा अहमद खा पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदर निवड झाल्याबद्दल सरपंच गुणवंती सुरज पाटील,उपसरपंच अलका सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य किरण कोळी,माजी सरपंच खेमचंद्र कोळी,ज्ञानेश्वर तायडे,सामाजिक कार्यकर्ते सुरज पाटील,शेखर तायडे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.