एकनाथ खडसे म्हणाले,“एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावले मी त्यांच्याकडे गेलो.तुम्ही प्रसारमाध्यम म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे ते मला म्हणाले.फडणवीस मला म्हणाले,मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे व तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे.त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो,देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासने देता,हे करेन,ते करेन परंतु तुम्ही ती आश्वासने पूर्ण करत नाही त्यामुळे मला खरे सांगा कारण माझा विश्वास बसत नाही.त्यावर ते मला म्हणाले, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत.मी त्यांना म्हटले,आनंदाची गोष्ट आहे,मला राज्यपाल केले तर चांगलेच आहे परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही.त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत.हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे” असे एकनाथ खडसे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलत होते.भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व एकनाथ खडसे यांना अनुकूल आहे.महाराष्ट्रातील त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी देखील त्यांच्या बाजूने आहेत तरीदेखील त्यांना राज्यपाल पद का दिले गेले नाही ? किंवा त्यांना भाजपात का घेतले गेले नाही ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत यावर खडसे म्हणाले,या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही.पक्षप्रवेश का झाला नाही,राज्यपाल का केले नाही हे मला माहिती नाही.त्यांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगत आहे.फडणवीस यांनी माझ्या राज्यपालपदाची शिफारस केली होती असे त्यांनीच मला सांगितले होते.