Just another WordPress site

परसाडे लोकनियुक्त सरपंच मिना तडवी अतिक्रमण प्रकरणी अपात्र !! जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश !! राजकिय वर्तुळात व परिसरात खळबळ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार

तालुक्यातील परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी शासकिय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले असुन या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की,तालुक्यातील परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच या पदावर येथील ग्रामपंचायत निवडणूक २२ मध्ये मिना राजु तडवी या अटीतटीच्या निवडणुकीत अल्पमतांनी निवडून आल्या होत्या.दरम्यान येथील शब्बीर कान्हा तडवी व ग्रामसेवक ग्रामपंचायत परसाडे यांनी निवडूण आलेल्या सरपंच मिना राजु तडवी यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध विविध प्रशासकीय यंत्रणेतुन चौकशी करीत सरपंच यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर दि.१२ सप्टेंबर २४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकनियुक्त सरपंच परसाडे मिना राजु तडवी यांना अतिक्रमण प्रकरणी अपात्र करीत असल्याचे आदेश पारित केले आहे.दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलतांना तक्रारकर्ते शब्बीर तडवी यांनी म्हटले आहे की,सदरचे अतिक्रमण प्रकरण हे कोणतेही राजकारण व राजकीय वाद किंवा हेवेदाव्यांचा नसुन प्रशासकीय नियमाची लढाई असुन यात आम्ही वरिष्ठांकडे केलेली वस्तुनिष्ठ तक्रार ही सत्य असल्याने निर्णय आमच्या बाजुला लागल्याची प्रतिक्रीया देत विजय हा सत्याचा झाला असल्याचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण प्रकरणातील तक्रारकर्ते शब्बीर कान्हा तडवी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.