Just another WordPress site

बँकांचे चुकीचे धोरण व वागणुकीमुळे तालुक्यातील मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण अडचणीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यासह विविध बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अमलबजावणी करणारे बॅंकेतील अधिकारी वर्गाकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत या योजनेच्या लाभार्थीची दिशाभुल व अडवणुक करण्यात येत असल्याच्या तक्रारी असुन वरिष्ठ पातळीवर तात्काळ दखल घेत बहीणींच्या अडचणी थांबवाव्या अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी आर्थिक सुरक्षा आणी स्वातंत्र्य वाढवणे या उद्दिष्ठाने मुख्यमंत्री लाडली बहीण ही प्रभावशाली योजनेची अमलबजावणी संपुर्ण राज्यात वेगाने करण्यात येत असुन तालुक्यातील बँक अधिकारी यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे लाडक्या बहीणींसाठी डोकेदुखी ठरत आहे.राज्य शासनाच्या माध्यमातुन लाडकी बहीण योजनेचे दोन महीन्यांचे ३००० हजार रूपये तात्काळ महीलांच्या बँक खात्यात टाकण्यात आले असुन स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक व सेन्ट्रल बँक या बँकेंच्या शाखांमध्ये प्राप्त झालेले पैसे मिळवण्यासाठी महिला अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहेत.सदरहू बॅंक अधिकारी हे राज्य शासनाच्या आदेशाची व नियमांची अमलबजावणी न करता आपआपल्या पद्धतीने बॅंकेचे व्यवहार करीत असल्याने काही महिलांना अद्याप पर्यंत पैसे मिळाले नसुन काही महिलांच्या आलेल्या पैशांमधुन बँक थकबाकी किंवा वेगवेगळे कारणे दाखवुन बँकच्या नियमांच्या नावाखाली शासनाकडून आलेल्या ३ हजार रूपयांमधुन विविध कारणे दाखवुन पैसे कपात केले जात असल्याने महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.बॅंकेच्या अशा व्यवहारांमुळे महीलांना योग्य रित्या त्यांच्या हक्काचे आलेले पैसे महिलांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे अशी ओरड लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.